मिळकतकर वसुलीसाठी 1 गाळा सील तर 5 नळ तोडले

मिळकतकर वसुलीसाठी 1 गाळा सील तर 5 नळ तोडले

महापालिकेच्या पथकांकडून 29.14 लाखाची वसूली 

सोलापूर  : मिळकत कर थकबाकी पोटी  महापालिकेच्या वसुली पथकाकडून आज गाळा सील  करण्यात आला तर विविध मिळकतींवरील 5 नळ तोडण्यात आले. आज दिवसभरात 29 लाख 14 हजार 18 रुपये विविध पथकांकडून कर वसूली करण्यात आली.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत  कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम गेल्या 17 दिवसापासून सुरू आहे.

       दरम्यान, आज अठराव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी  कारवाई केली. 5 नळ तोडण्यात आले आहेत. तर  एक गाळा सिल करण्यात आला.

       आज पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद  कारवाई याप्रमाणे – पथक क्रमांक 1 – वसुली 2 लाख  27 हजार 962 रुपये , पथक क्रमांक  2 – वसुली 2 लाख 9 हजार  178 रूपये – एक गाळा सील, पथक क्रमांक 3 – वसुली 2 लाख 67  हजार 402 रूपये, पथक क्रमांक  4- वसुली – 60 हजार 967 रुपये  , पथक क्रमांक  -5 – वसुली 1 लाख 42 हजार 966 रुपये, पथक क्रमांक-6 वसुली 14 लाख 40 हजार 951, पथक क्रमांक -7- वसुली 3 लाख 91 हजार 492 रुपये  , पथक क्रमांक -8 – वसुली- 1 लाख 27 हजार 317 रुपये- 2 नळ बंद  , पथक क्रमांक -9 – वसूली – 45 हजार 783 रूपये – 3 नळ बंद केले. आजचा एकूण भरणा 29 लाख 14 हजार 18 रुपये झाला आहे. तर 5 मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

       थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *