दिवसभरात महापालिका तिजोरीत 33.32 लाखाचा कर भरणा
सोलापूर : मिळकत कर थकबाकी पोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवरील 9 नळ तोडण्यात आले. आज दिवसभरात महापालिका तिजोरीत
विविध पथक आणि संकलन केंद्रासह एकूण 33 लाख 32 हजार 971 रुपये कर भरणा झाला आहे.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम गेल्या 19 दिवसापासून सुरू आहे.
दरम्यान, आज सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई करत 9 नळ तोडण्यात आले आहेत. आज पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद कारवाई याप्रमाणे – पथक क्रमांक 1 – वसुली 81 हजार 731 रुपये-1 नळ बंद , पथक क्रमांक 2 – वसुली 1 लाख 11 हजार 800 रूपये – 5 नळ बंद, पथक क्रमांक 3 – वसुली 3 लाख 37 हजार 666 रूपये, पथक क्रमांक 4- वसुली – 1 लाख 15 हजार 289 रुपये , पथक क्रमांक -5 – वसुली 69 हजार 324 रुपये, पथक क्रमांक-6 वसुली 3 लाख 17 हजार 569 रूपये, पथक क्रमांक -7- वसुली 2 लाख 88 हजार 277 रुपये – 1 नळ बंद, पथक क्रमांक -8 – वसुली- 82 हजार 474 रुपये , पथक क्रमांक -9 – वसूली – 20 हजार 494 रूपये – 2 नळ बंद केले. आज विविध पथकांकडून एकूण 14 लाख 24 हजार 624 रुपये वसुली करण्यात आली आहे. तर 9 मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान आज दिवसभरात विविध वसुली पथक आणि महापालिकेतील कर संकलन केंद्र असे
सर्व मिळून एकूण 33 लाख 32 हजार 971 रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे.
थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.