त्या नवीन रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करा
सोलापूर विकास मंचच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन
सोलापूर : श्री सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट कार्यालय येथे होणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत दुकाने आणि इतर अतिक्रमण होऊ नये या करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विषेश दक्षता घ्यावी. अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित श्री सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट कार्यालयाच्या समोरील नवीन रस्ता व्हावा ही सोलापूरकरांची इच्छा होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ता निर्माण होत आहे. जानेवारी महिन्यात यात्रेकरूनां या रस्त्याचा तथा दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या नव्या होणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याची दक्षता आता महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव आदी उपस्थित होते.