अखिल भारतीय काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी हेमंत जाधव यांची निवड….

सोलापूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, वर्तमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी आणि तळागाळात जाऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हेमंत दत्तात्रय जाधव यांची काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नियुक्तीपत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते हेमंत जाधव यांना देण्यात आले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष पद स्वीकारताना मी कौशल्यपूर्वक काम करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील जनतेच्या हिताचे कार्य व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा आणि पक्ष संघटनेसाठी मी प्रयत्न करीन असे हेमंत जाधव यांनी सांगितले आहे.

हेमंत जाधव यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहराध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक वीरेश नसले, मनोज जखेटिया, सतीश घोडके, प्रकाश पाटील न्यू जॉगर्स फौंडेशनचे अध्यक्ष संतोषकुमार कदम व पदाधिकारी, जुळे सोलापूर भागातील मित्रपरिवार, अशोक नगर गणेश मंडळ, काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शूभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *