मिळकत कर वसुलीपोटी आरबीएल बँकेचे एटीएम केले सील 

मिळकत कर वसुलीपोटी आरबीएल बँकेचे एटीएम केले सील 

दिवसभरात एकूण १.६८ कोटी रूपये कर वसूली 

सोलापूर  :  महापालिकेच्या वसुली पथकांकडून मिळकत करापोटी आज रेल्वे लाईन येथील आरबीएल बँकेचे एटीएम सेंटर सील करण्यात आले. दरम्यान, आज दिवसभरात विविध पथकांकडून एकूण १ कोटी ६८ लाख ७८ हजार ८७७ रुपये मिळकत कर वसूल करण्यात आला आहे.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत  कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद मोहीम सुरू आहे.    

          महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या ३० दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी पोटी आज शहरातील रेल्वे लाईन भागातील आरबीएल बँकेकडील १५ लाख १३ हजार ४७४ रुपये थकबाकी पोटी एटीएम सेंटर सील करण्यात आले.

पथकनिहाय वसुली व कारवाई 

पथक १ –   ३३ लाख २१ हजार २०६ रुपये ,

पथक  २ –   ५ लाख ५६ हजार ४३७ रुपये, 

पथक ३  – २ लाख ३३ हजार ५४० रुपये,

पथक ४  –   २ लाख ८५ हजार ४१ रुपये, 

पथक ५  –   ३६ हजार २७८ रुपये, 

पथक ६  –  ५ लाख ५३ हजार १४४ रुपये, 

पथक ७  –  २ लाख १८ हजार ८६९ रुपये  ,

पथक – ८ – १ लाख ८२ हजार १२८ रूपये ,

पथक ९ –  १ कोटी १४ लाख ९२ हजार २३४ रूपये.

      आज  दिवसभरात विविध वसुली पथकांनी रोख, धनादेश व आरटीजीएस असे सर्व मिळून एकूण १ कोटी ६८ लाख ७८ हजार ८७७ रुपये मिळकत कर वसुल केला.

        थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *