
विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे तरच जीवनात प्रगती साधता येईल -मुख्याध्यापक दादासाहेब साळवे
नातेपुते (प्रतिनिधी)-
जि प शाळा कळंबोली येथील इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक साळवे सर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे तरच जीवनात प्रगती साधता येईल सध्याचे युग स्पर्धात्मक युग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पहिजे. इथून पुढे गेल्यानंतर क्षणाबाबत तुम्हाला कोणतेही अडचण येऊ द्या ते अडचण दूर करण्यासाठी मी उभा असेल. तसेच पिरळे शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद शिंदे, यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी
. अंकुश सावंत सर, संतोष चोरमले ,बोधे मॅडम, काळे साहेब, सानप सर, प्रमोद सोनवळ सर, काका साहेब जाधव सर,मारकड सर, अतुल जाधवर सर, पांडुरंग ढाळे सर, बगाडे सर, गणेश शिंदे सर, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित पाटोळे सर, घाडगे मॅडम साळवे सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटोळे सर यानी केले.