सोलापूर शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी  पाऊस 

दोन ठिकाणी झाड पडले 

सखल भागात साचले पाणी 

सोलापूर :  शहरात आज सायंकाळी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह  अवकाळी पाऊस झाला. यामुळे  शहरात दोन ठिकाणी झाड पडले. सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले.

       सोलापूर शहरात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण दिसून आले. सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाट आणि 

 वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे चाकरमान्याची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी साधारणता: तासभर हा पाऊस झाला. 

     दरम्यान, या पावसामुळे सोलापूर शहरातील विविध सखलभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागली. एसटी स्टँड परिसर, रंग भवन चौक, निराळी वस्ती रोड, सम्राट चौक यासह विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. 

       वादळी वाऱ्यामुळे शहरातील डफरीन हॉस्पिटलच्या कंपाउंडवर मोठ्या झाडाची फांदी तुटली असल्याचे दिसून आले. यामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. थोड्यावेळाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हटविल्या. त्याचबरोबर सिव्हील चौकाजवळही एक झाड पडल्याची घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *