पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक

आकर्षक देखाव्यातून घडले अहिल्यादेवींच्या 

जीवन कार्याचे  दर्शन

डॉल्बीच्या निनादात थिरकली तरुणाई

सोलापूर :  येळकोट येळकोट…जय मल्हार ….

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जय जय कार करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पारंपरिक वाद्य,  डीजेच्या तालावर भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत शहरात जल्लोषात मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक जीवन कार्याचे दर्शन घडविले. 

          चार हुतात्मा चौक येथील पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  विविध संस्था, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

जयंतीनिमित्ताने  वधू-वर परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा, महाप्रसादाचे वाटप असे विविध उपक्रमही राबविण्यात आले.

      दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पारंपरिक वाद्यांसह

डीजे, ढोल, ताशे  धनगरी वाद्यांच्या गजरात उत्साही वातावरणात दिमाखदार मिरवणुकीला सुरुवात झाली. येळकोट येळकोट…जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पिवळे ध्वज व भंडाऱ्याची मुक्त

उधळण करीत राजमाता अहिल्यादेवींचा जयजयकार करण्यात आला.

मिरवणुकीच्या मध्यभागी असलेली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. 

      या मिरवणुकीत विविध देखावाच्या माध्यमातून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आणि होळकर परिवाराच्या ऐतिहासिक कार्याचे दर्शन घडले. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. उत्साही वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली.

        शेळगी, शाहीर वस्ती, मराठा वस्ती, जुळे सोलापूर, बाळे, अक्कलकोट रस्ता, नीलम नगर, देगाव रोड, विजापूर  रस्ता यासह शहरात विविध ठिकाणी  सार्वजनिक मंडळांनी मूर्ती व प्रतिमेची प्रतिष्ठापना करून  विविध उपक्रम राबविले. मध्यवर्ती मंडळांतर्फे काढण्यात  आलेल्या मिरवणुकीत शहरासह परिसरातील  मंडळांनी सहभाग घेतला होता.

         दरम्यान,  सरस्वती युवक प्रतिष्ठान, हिंदू धनगर प्रतिष्ठान, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्लोक बहुउद्देशीय सामाजिक संस्था, भगवा रक्षक प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना, राजमाता युवा प्रतिष्ठान,

 पुण्यश्लोक बहुउद्देशिय सामाजिक संस्था  व अहिल्यादेवी सरस्वती युवक  प्रतिष्ठान यांच्यासह विविध मंडळांनी या मिरवणुकीत आकर्षक देखावे सादर केले होते. 

         डोक्यावर फेटा, कपाळी भंडारा, नृत्याच्या तालावर मिरवणूक पुढे हळूहळू सरकली. महिला नऊवारी साड्या, पिवळा फेटा परिधान करून मिरवणुकीत उत्साहात सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत ऐतिहासिक , धार्मिक , सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. सर्व पदाधिकारी पिवळ्या टोप्या, पिवळे ध्वज घेऊन सहभागी झाले होते.  मिरवणुकीत पारंपरिक हलगी, धनगरी ढोल, ध्वज, धनगरी गजनृत्यसह विविध पथकांचा समावेश होता. 

        छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे भागवत टॉकीज, नवी वेस, सरस्वती चौकमार्गे 

 मिरवणूक चार हुतात्मा पुतळा चौक येथे आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

         संघर्ष सेना व शेखर बंगाळे मित्र परिवार व  राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान ग्रुप यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *