उप अभियंता तपन डंके यांची तत्परता ; तत्काळ केली दुरुस्ती
सोलापूर : शहरातील सरस्वती चौक येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास अचानक जलवाहिनी फुटल्याने काही वेळ मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ही माहिती समजताच उपअभियंता तपन डंके हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करून घेतली.
उजनी धरणाची पाणी पातळी वरचेवर घटत आहे. पाणी पातळी वजा 60 टक्के झाली आहे. यामुळे उजनी धरणात तिबार पाणी उपसा होत आहे.सोलापूर शहराला सरसकट पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत आणि दूषित होत असल्याने नागरिकांतून मोठी ओरड होत आहे. दुसरीकडे शहरातील सरस्वती चौक येथे आज रविवारी रात्री आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला फुटपाथ शेजारी जलवाहिनी फुटली. सुमारे आठ – दहा फूट पाण्याचे कारंजे वर उडत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त झाला.
दरम्यान, येथील जलवाहिनी फुटल्याची माहिती समजतात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तपन डंके हे तत्काळ सरस्वती चौकात घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून तातडीने त्यांनी ही जलवाहिनीची दुरुस्ती करून घेतली. यामुळे वाया जाणारे पाणी थांबले. तत्काळ कार्यवाही झाल्याने अधिकचा पाण्याचा अपव्य टळला
